Uddhav Thackeray News saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray News: CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; मेळाव्याची जय्यत तयारी सुरू

Uddhav Thackeray Hindi speaking meeting: स्वतः उद्धव ठाकरे हे ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये येणारे आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विकास काटे

Uddhav Thackeray In Thane: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात धडाडणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये येणारे आहेत. मुंबईनंतर ठाण्यात देखील उद्धव ठाकरे हिंदी भाषिक मेळावा घेणार आहेत. (Latest Maharashtra Political News)

उद्धव ठाकरे गटाचा हिंदी भाषिक मेळावा ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 6:30 च्या सुमारास होणार आहे. यासाठी ठाण्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. जागोजागी बॅनरबाजीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे.

मोठ्या प्रमाणात या मेळाव्यात हिंदी भाषिक यांचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मराठी भाषिकांनंतर हिंदी भाषिकांची देखील मोठ्या प्रमाणात साथ लाभणार आहे. "उत्तर भारतीय के सन्मान में" शिवसेना मैदान में अशा प्रकारची घोषणा यापूर्वी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच हिंदी भाषिक कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. मात्र त्यावेळी इर्शाळवाडीत मोठी दुर्घटना घडली. या घटनेमुळे हे संमेलन रद्द करण्यात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

SCROLL FOR NEXT