jitendra awhad
jitendra awhad  saam tv
मुंबई/पुणे

Mumbra Clashes : उद्धव ठाकरे मुंब्य्रात; जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी रोखलं

Bharat Bhaskar Jadhav

Mumbra Clashes :

मुंब्रा शहरातील ठाकरे गटाची शाखा पाडण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. याच घटनेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज मुंब्य्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आलेत. उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी रोखलंय. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी कल्याणवरून मुंब्य्राला निघालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना कल्याण महात्मा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest News)

कल्याण रेल्वेस्टेशन परिसरातून रेल्वेचा प्रवास करत मुंब्य्रात जाण्यापूर्वी कल्याण स्टेशन परिसरातून महात्मा फुले पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकून महात्मा फुले पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. दरम्यान वादग्रस्त शाखेच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड पोहोचले होते. परंतु आव्हाड यांना पोलिसांनी रोखले आहे. आपण वादग्रस्त शाखेपर्यंत जाणार आणि तेथे पाहणी करणार असल्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतलीय. यामुळे आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झालीय.

या वादानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे हेही मुंब्रामध्ये पोहोचले आहेत. शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची गाडी अडवली होती. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखेला भेट देण्यासाठी आले आहेत. ते मुंब्रा येथे दाखल होताच शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून त्यांची गाडी अडवण्यात आली.

उद्धव ठाकरे यांच्याआधी जितेंद्र आव्हाड हे वादग्रस्त शाखेची पाहणी करण्यासाठी जात होते. परंतु पोलिसांनी त्यांना रोखलं. पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवल्यानंतर आव्हाड आक्रमक झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Video: 48 पैकी 49 जागाही Uddhav Thackeray जिंकून आणू शकतात! देवेंद्र फडणवीसांच्या विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ

Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

SCROLL FOR NEXT