uddhav thackeray group saamana editorial slams pm narendra modi on manipur violence  Saam TV
मुंबई/पुणे

Political News: मागच्या दीड महिन्यापासून जीव मुठीत धरून जगणारे हिंदू नाहीत का? सामनातून PM मोदींना सवाल

Saamana Editorial on Manipur Violence: ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातून मणिपूर हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही सवाल देखील उपस्थित करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Saamana Editorial on Manipur Violence: गेल्या दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला असून अजूनही हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, या हिंसाचारावर ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही सवाल देखील उपस्थित करण्यात आले आहे.

हिंसाचारात जळणाऱ्या मणिपूरची जनता दीड महिन्यापासून जीव मुठीत धरून जगते आहे आणि देशाचे पंतप्रधान या गंभीर संकटाविषयी चकार शब्दही बोलत नाहीत. मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांच्या हल्ल्यात हिंदू मरत आहेत आणि नकली हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे तथाकथित महाशक्तीचे सरकार डोळे मिटून हा रक्तपात पाहत आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली.

देशभरात हिंदू जनआक्रोश मोर्चे काढणाऱ्या सरकार पक्षाला मणिपुरातील हिंदूंचा नरसंहार दिसत नाही काय? मणिपूरचा हिंदू ‘हिंदू’ नाही काय? मणिपूर हे राज्य हिंदुस्थानचा भाग नाही, असे केंद्रीय सरकारला वाटते आहे काय? मणिपूरमधील हिंसाचाराची मजल आता केंद्रीय मंत्र्यांचे निवासस्थान जाळण्यापर्यंत गेली याचा अर्थ काय? असा सवालही सामनातून मोदी सरकारला करण्यात आले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये खुलेआम कत्तली व रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत 115 हून अधिक लोक मणिपूरमध्ये पेटलेल्या जातीय वणव्यात मृत्युमुखी पडले. 400 हून अधिक लोक या हिंसाचारात जखमी झाले. जिवाच्या भीतीने हजारो नागरिकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे, असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री मणिपूरच्या दौऱ्यावर गेले असता हिंसाचार व दंगलींचे सारे खापर न्यायालयावर फोडून त्यांनी हात झटकले. देशातील जनतेच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी गृहखात्याची आहे याचेही भान सरकारला राहिलेले नाही. शिवाय, ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ले सुरू आहेत, ते पाहता हा सगळा हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग असावा असे दिसते, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

राज्य व केंद्रातही भाजपची सत्ता असताना मणिपूर का पेटले? ‘डबल इंजिन’चे सरकार तिथे फेल का झाले व अजूनही तिथे शांतता प्रस्थापित का होऊ शकली नाही याचे उत्तर आता सरकार पक्षाच्या वाचाळवीरांनी द्यायला हवे. हिंसाचारात जळणाऱ्या मणिपूरची जनता दीड महिन्यापासून जीव मुठीत धरून जगते आहे आणि देशाचे पंतप्रधान या गंभीर संकटाविषयी चकार शब्दही बोलत नाहीत, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

Edited by -Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT