Uddhav thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeay Dasara Melava : 'मी श्वानप्रेमी, पण लांडग्यावर प्रेम करणारा नाही; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Uddhav Thackeay on cm eknath shinde : उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लांडग्यावर प्रेम करणारा नसल्याचं म्हणत ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.

Vishal Gangurde

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. 'मी श्वानप्रेमी आहे, पण लांडग्यावर प्रेम करणारा नाही,असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे ठाकरे कुटुंबियांनी सुद्धा जी शस्त्रपूजा केली. त्यामध्ये शिवसेनाप्रमुखांचा कुंचला, ज्याने फटकारे मारले ज्याने आपल्या मनगटात चेतना पेटवली. आता मी तुमची पूजा करतोय. तुम्ही माझे शस्त्र आहात. ही लढाई सोपी नाही..

उद्धव ठाकरेंना नेस्तनाबूत करण्याचा मनसुबा आखला. पण तुमचं पाठबळ नसते तर मी आज उभाच राहिलो नसतो. सगळं काही ओरबाडून घेतल्यानंतर तुम्ही उभे राहिलात. त्यांच्या कितीही पिढ्या येऊ द्या.. त्या गाढून भगवा फडकावेन.. आमच्याकडे लढवय्या मन आहे.

दरवर्षी शिवसेनाला अंकूर फुटतोय. आज जे भगवे आहेत, त्याच्या मशाली झाल्या आहेत. इथला प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांची मशाल बनून चूढ लावणार नाही.

रतन टाटांनी काय केलं, त्यांनी अनेक काय केलं.. त्यांनी रोजच्या जेवणातील चव वाचवण्यासाठी मीठ दिलं. पण आताचे उद्योगपती मिठागर गिळत आहेत. जे जायला पाहिजेत, ते जात नाहीत अन् जे जायला नको ते जात आहेत. टाटा गेल्याचं वाइट वाटलं.

मी श्वानप्रेमी आहे, पण लांडग्यावर प्रेम करणारा नाही. हे वाघाचे कातडे अंगावर घेणारे लांडगे आहेत. पण काय काय उघडे पडतेय, हे त्यांना माहीत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT