Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: 'मी मुख्यमंत्री होणार नव्हतो, पण...'; शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंची महत्वाची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray News: 'मी मुख्यमंत्री होणार नव्हतो, पण शरद पवार यांनीच मला मुख्यमंत्री केले, असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.

Vishal Gangurde

आवेश तांदळे

Uddhav Thackeray News:

सकाळचे संपादक राहुल गडपाले यांच्या 'अवतरणार्थ' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवारांच्या उपस्थितीत महत्वाची प्रतिक्रिया दिली. 'मी मुख्यमंत्री होणार नव्हतो, पण शरद पवार यांनीच मला मुख्यमंत्री केले, असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. (Latest Marathi News)

'अवतरणार्थ' पुस्तकाच्या प्रकाशनातील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्र सोडलं.

'भाई और बहनों अमरावतीसे मेरा बहुत पुराना रिश्ता है. यात हसण्यासारखं नाही. माझी आजी ही अमरावतीतील परतवाड्याची आहे. मी उगाच फेकाफेकी करणार नाही. जे नातं आहे ते आहे, ते नाही ते नाही, असं म्हणत ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 'आता सर्व ठिकाणी अंधार पसरला आहे. त्यामुळे काही लोक बोलत नाही. पण वणवा पेटला तर काय होते, हे सर्वांना माहीत आहे. सध्या चौथ्या स्तंभाला वाळवी लागल्याचे दिसत आहे. खरंतर सध्या ईडीस कारभार चालू आहे. पहिलं हिडीस वागणं म्हणायचो. मात्र, आता ईडीस कारभार सुरू आहे,अशी टीका ठाकरेंनी केली.

'आम्ही काँग्रेससोबत गेल्यामुळे शिवसेना काँग्रेसची झाली, असे काही जण म्हणतात. मात्र, आम्ही 30 वर्ष भाजपसोबत होतो. तेव्हा शिवसेना भाजप झाली नाही, मग आता काय होईल. मी काही हिंदुत्व सोडले नाही. त्यात भाजप आणि आमचे हिंदुत्व वेगळे आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंची महत्वाची प्रतिक्रिया

'मी फोटोग्राफी करायचो, व्यंगचित्र काढायचो. मी राज्याचा मुख्यमंत्री होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. मी मुख्यमंत्री होण्याला शरद पवार जबाबदार असून मला जनतेनेही स्वीकारलं. मला त्या काळात जमलं जेवढं केलं. कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मान मिळाला, हीच माझ्या आयुष्याची कमाई आहे, असे ठाकरेंनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं 'कमळ'

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT