Uddhav thackeray News Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांच्या नेमणुकीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणाले, 'लोकशाही...'

Uddhav Thackeray Latest News: लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी पक्षांतर बदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्याच्या समितीवर राहुल नार्वेकरांची निवड झाली आहे. या नेमणुकीवरून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकावर घणाघात केला आहे.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, मुंबई

Uddhav Thackeray News:

लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी पक्षांतर बदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्याच्या समितीवर राहुल नार्वेकरांची निवड झाली आहे. या नेमणुकीवरून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकावर घणाघात केला आहे. राहुल नार्वेकरांची नेमणूक ही देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांच्या नेमणुकीवरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला. आम्ही त्यांचे वस्त्रहरण जनतेच्या न्यायालयात तर केले आहे. महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवल्या. त्यात उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'आम्ही त्याचे वस्त्रहरण जनतेच्या न्यायालयात केलेच आहेत. परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल, असेही ते म्हणाले.

'आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा यापुढे देशात असेल असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॅाक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल. अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल, असा इशाराही ठाकरेंनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबई हादरली! भररस्त्यात गोळीबाराचा थरार, एकाच्या पायात घुसली गोळी

Pune News: पुण्यातील मनोरुग्णालयात तरुणाची आत्महत्या, खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

इंदिरा गांधींचंही सोनं न खरेदी करण्याचं आवाहन? मोदींसारखाच इंदिरा गांधींचा 1967 साली निर्णय?

आधी डोकी फोडली, आता सत्तेसाठी एकवटली? अंबरनाथ पालिकेत शिंदेसेना-भाजपची युती?

NEET UG परीक्षा रद्द, आता पुढे काय? विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करून फी भरावी लागणार का?

SCROLL FOR NEXT