Uddhav thackeray News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ठाकरेंच्या शिवसेनेवर बोलताना संदीप देशपांडेंनी पातळी ओलांडली, म्हणाले तुम्ही काय $#टली

Shiv Sena-MNS Alliance News Update :राज-उद्धव ठाकरे युतीच्या चर्चांनंतर शांतता होती, मात्र संदीप देशपांडेंच्या ट्वीटमुळे वाद पेटला आहे. 'जिलेबी अने फाफडा' या वक्तव्यामुळे मनसे-शिवसेनेमध्ये कटुता वाढली असून, शिवसैनिक सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray And Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळाले होते. राज ठाकरेंनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला होता. राज्यात अनेक ठिकणी मनसे आणि शिवसैनिक एकत्र आले होते. मुंबईमध्येही ही परिस्थिती पाहायला मिळाली होती. मुंबईमध्ये नव्या युतीची नांदी होत असतानाच फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली अन् राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली. फडणवीस-राज ठाकरे यांच्याभेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून संजय राऊत आणि शिवसेनेवर टीकी केली जाऊ लागली. शांत राहणारे संदीप देशपांडे शिवसेनेबाबत आक्रमक बोलताना काही दिवसांपासून दिसत आहेत. आता संदीप देशपांडे यांनी केलेल्य ट्वीटची चर्चा होत आहे. ठाकरेंना लक्ष करताना देशपांडे यांनी अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य केलेय.

संदीप देशपांडे यांनी आज सकाळी केलेल्या एका ट्विटमुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील युतीला सुरूंग लागल्याचे बोलले जात आहे. एक्सवर पोस्ट करत संदीप देशपांडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. होय आम्ही नवीन आहोत, पण कधी 'केम छो वरळी' म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत.'जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा', असं म्हणालो नाही, असा टोला मनसे नेते देशपांडे यांनी केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आक्रमक होत उत्तर दिले आहे. मनसेचे गुजराती बॅनर पोस्ट करत देशपांडे यांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. "मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी 20 हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली, असेही संदीप देशपांडेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. देशपांडेंच्या पोस्टला शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. संदीप देशपांडेंच्या ट्विटला आता संजय राऊत काय उत्तर देतात? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

SCROLL FOR NEXT