Uday samant On Thackeray Group Saam TV
मुंबई/पुणे

Uday samant On Thackeray Group : ठाकरे गटाचे १३ आमदार शिवसेनेच्या संपर्कात? उदय सामंत यांचा मोठा दावा

ठाकरे गटाचे १३ आमदार शिवसेनेच्या संपर्कात? उदय सामंत यांचा मोठा दावा

Satish Kengar

Uday samant On Thackeray Group : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे 13 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे 20 आमदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

साताऱ्यात काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचंही ते म्हणाले आहेत.

उदय सामंत यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र सामंत यांच्या या दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.  (Latest Political News)

काय म्हणाले उदय सामंत?

उदय सामंत म्हणाले की, ''उरलेले १३ आमदार (ठाकरे गटाचे) एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे 20 लोक (आमदार) शिंदे यांच्या संपर्कात आहेत, अशी देखील चर्चा आहे. काँग्रेसचे बडे नेते काल महाबळेश्वर येथे शिंदे यांना भेटले, ही देखील चर्चा आहे. चर्चा भरपूर होऊ शकतात, मात्र ते सत्यात उतरायला हवं.''  (Maharashtra Politics)

उदय सामंत यांच्या वक्तव्यावर नाना पटोले काय म्हणाले?

उदय सामानात यांच्या दाव्यावर नाना पटोले म्हणाले की, यावर चर्चा करण्याचा काय संबंध आहे? भाजपला चुकून १०५ आमदार निवडून दिले, त्याचा परिणाम महाराष्ट्र भोगत आहे. यांना सत्तेचा माज आलं असल्याचं ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: 'या' राशीला मिळणार राजयोग,५ राशींवर राहणार देवाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल, तर काहींच्या अंगावर येतील अनेक जबाबदाऱ्या, तुमची रास यात आहे का?

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT