Pune Uber Auto saam Tv
मुंबई/पुणे

Uber Auto: ऐकलं का! उबर रिक्षा सेवेत नवा बदल; आता ऑटोचा प्रवास होणार स्वस्त

Pune Uber Auto: सरकारने ठरवून दिलेले दर लागू केल्यामुळे उबर अ‍ॅपचा वापर करताना देखील अधिकृत दरच ग्राह्य धरले जात आहेत. यामुळे चालकांना देखील याचा फायदा होत आहे.

Bharat Jadhav

मोबाईल अ‍ॅपवरून रिक्षा सेवा देणारी ‘उबर’ कंपनीने ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने प्रवास भाड्याबाबत नवीन नियम लागू केलाय. नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून आता मीटरप्रमाणेच भाडे आकारले जाणार आहे. उबर कंपनीने 18 फेब्रुवारीपासून चालकांशी असलेल्या करारात बदल केलाय. नव्या अटींनुसार उबर दर ठरवत नाही.हे दर प्रवासी आणि चालकांमध्येच भाड्याचा निर्णय घेतला जातो.

यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) निश्चित केलेले मीटर दर लागू केले जातील. सध्या 17 रुपये प्रति किलोमीटर इतका अधिकृत दर आकरला जातो. याच दरानुसार प्रवाशांकडून भाडे आकारले जाईल. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वीच रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारले जाणार असल्याची स्पष्ट माहिती प्रवाशांना देणे आवश्यक असणार आहे.

ही अट आरटीओने स्पष्टपणे अधोरेखित केली आहे आणि जर चालकांनी अधिक भाडे आकारले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आलाय. या नवीन प्रणालीमुळे काही प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. मात्र, काही प्रवाशांनी दरात येणाऱ्या चढउतारांमुळे नाराजी व्यक्त केलीय.

तर बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय. रिक्षाचालक व्यवसायात आता अधिक समाधान व्यक्त करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कारण मीटरप्रमाणे भाडे घेतल्यामुळे पारदर्शकता वाढलीय. त्यामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं क्षीरसागर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT