Fire, Kalyan saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Fire News : घास बाजारनजीकच्या इमारतीमधील आग नियंत्रणात; आजीसह नातीचा मृत्यू

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

साम न्यूज नेटवर्क

- अभिजीत

Kalyan Fire News : कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला अचानक आग लागली. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही आग (fire) लागली हाेती. (Breaking Marathi News)

या भीषण आगीत घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तसेच घरात झोपलेल्या ७० वर्षीय महिलेचा व २२ वर्षीय मुलगी गंभीर जखमी (injured) झाल्या होत्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

खातीजा हसम माइमकर व इब्रा रौफ शेख अशी मयतांची नावे आहेत. आजी आणि नात असे या दाेघींचे नाते आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत घराचे (house) संपूर्णपणे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT