Pune nEws Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: मामाकडून दोन भाचींना विवस्त्र करुन मारहाण, पुण्यातील संतापजनक प्रकार

भाच्याने मामाच्या मुली बरोबर पळून जाऊन लग्न केले म्हणून भाच्याच्या दोन बहिणींना नग्न करून मारहाण करण्यात आली.

Dnyaneshwar Choutmal

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मन सून्न करणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुन्हा एकदा अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. तरुणीला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमध्ये समोर आला आहे.

भाच्याने मामाच्या मुली बरोबर पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरुन भाच्याच्या दोन बहिणींना नग्न करून मारहाण करण्यात आली. मामाच्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर मारहाणीचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. पुढे तरुणाने तिच्यासोबत लग्न केले. याच रागातून या मामाने तरुणाने भाच्याच्या दोन्ही बहिनींना मारहाण केली. धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनीही कारवाई केली आहे. एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT