Mumbai Police news  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Mumbai Police news : मुंबईत एसीबीने मोठी कारवाई केली आहे. एसीबीने पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे.

Vishal Gangurde

मुंबईत वडाळा टी.टी. पोलिस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी लाच घेताना अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरोदे आणि पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी एकूण ₹4.5 लाखांची मागितली लाच

सरोदे 2 लाख आणि वाघमोडे 30 हजारांची लाच घेताना अटक

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईत भ्रष्टाचारविरोधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. एसीबीने 26 सप्टेंबर रोजी कारवाई करत वडाळा टी.टी. पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी रंगेहाथ सापडले आहेत. एसीबीने केलेल्या कारवाईनंतर पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुधाकर सरोदे (52) आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल रमेश वाघमोडे (37) यांनी गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात अनुक्रमे 4 लाख आणि 50 हजारांची मागणी केली होती.

या तपासानंतर तडजोडीने मागणीची रक्कम सरोदेंसाठी 4 लाख आणि वाघमोडेसाठी ₹50 हजार ठरली. 26 सप्टेंबर रोजी सरोदेंनी ₹2 लाखांचा पहिला हप्ता दिला. तर वाघमोडे यांनी 30 हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारले. त्याचवेळी एसीबी पथकाने दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली.

एसीबीने ही कारवाई पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले यांच्या देखरेखीखाली तपास अधिकारी नितीन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेला अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उपआयुक्त अनिल घेरडीकर आणि राजेंद्र सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले. कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी, असं आवाहन एसीबीने सर्व नागरिकांना केलं आहे.

एसीबीच्या कारवाईमुळे भ्रष्टाचाराच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रकाश पडलाय. गेल्या काही वर्षांपासून पोलीस विभागातील गैरप्रकारांमुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढलाय. भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे कायद्यावरील विश्वास उडायला लागतो. मात्र, एसीबीच्या कारवायांमुळे भ्रष्ट अधिकार्‍यांवर वचक बसण्यास मदत होते. नागरिकांनी या प्रकारची लाच कोणत्याही अधिकाऱ्याने मागणी केल्यास त्वरित तक्रार करून पुढाकार घ्यावा, असं आवाहन एसीबी अधिकाऱ्यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPF update: इन हँड सॅलरी वाढणार, पीएफ नियम बदलले; कोणाला कसा फायदा होणार? जाणून घ्या

Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारने २ वर्षीय श्रृतिकाला चिरडलं, डॉक्टरविरोधात गुन्हा; थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: रायगडच्या दरी-डोंगरांत धबधबे प्रवाहीत; पर्यटनाला सुरुवात

Live Location Sharing : WhatsApp, Instagram वर तुम्हीही शोधू शकता मित्रांचे लाइव्ह लोकेशन; जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

Hindu Temple Tradition: मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्यांचा आशीर्वाद का घेतला जातो?

SCROLL FOR NEXT