Pune Bhor Accident  
मुंबई/पुणे

Pune Accident : भोरमध्ये भीषण अपघात, २ दुचाकी समोरासमोर धडकल्या, २ जणांचा जागीच मृत्यू

Pune Bhor Accident : भोर-मांढरदेवी मार्गावर दुचाकींच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. हेल्मेट नसल्यामुळे डोक्याला मार लागला अन् दोन जणांनी प्राण सोडले.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुण्यातील मांढरदेवी मार्गावरील निळकंठ गावाच्या हद्दीत झालेल्या दुचाकी अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली, अपघात इतका भीषण होता, की एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याने उपचारादरम्यान प्राण सोडले. अपघाताबाबत वैभव गायकवाड यांनी तक्रार दाखल केली असून, अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मांढरदेवी मार्गावरील निळकंठ गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. चंद्रकांत लक्ष्मण जावळे (वय ६०,रा.नीरा ता. पुरंदर) व उत्तम गायकवाड (वय ४५, रा. नीलकंठ) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

याबाबत भोर पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, मयत चंद्रकांत जावळे आणि उत्तम गायकवाड हे दुचाकी (क्रमांक एम एच १२ टी जी ०९४६) वरून निळकंठ गावाकडे निघाले होते. त्यावेळी समोरून येत असलेली दुचाकी (क्रमांक एम एच १२ डब्ल्यू सी २७२०) यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघेही रस्त्यावर पडले. दोघांच्याही डोक्यांना जबर मार लागला होता. दुचाकींच्या धडकेनंतर चंद्रकांत जावळे यांचा जागीच मृत्यू झाला तर उत्तम गायकवाड यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी काही मिनिटांमध्येच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसरा दुचाकीस्वार ही जखमी झाल्याने तोही उपचारासाठी निघून गेला. याबाबत वैभव आनंदा गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT