nagar pune highway, supa police station saam tv
मुंबई/पुणे

Nagar Pune Highway : कोयता गॅंग झाली पुन्हा सक्रिय; नगर- पुणे महामार्गावर धिंगाणा, सहा जणांवर गुन्हा

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सुशिल थाेरात

Supa Police Station : नगर पुणे महामार्गावर (nagar pune highway) असणाऱ्याा सुपा (supa) या गावात (village) किरकोळ कारणातून एका पान शॉप (paan shop) चालकास एका टोळक्याने कोयत्याने आणि लाकडी दंडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत दाेघे जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत.

नगर पुणे महामार्गावरील सुपा गावातील पान शॉप चालक समीर जब्बार सय्यद आणि साजीद शेख यांना काही अनाेळखी व्यक्तींनी काेयताने तसेच दांडक्याने मारहाण केली. त्यात हे दोघे गंभीर जखमी झाले. साजीद शेख याच्यावर खाजगी दवाखान्यात (hospital) उपचार सुरू आहेत. (Maharashtra News)

या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात (supa police station) कैफ मण्यार यांच्यासह अनोळखी पाच सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे.

दरम्यान नगर शहरात पुन्हा एकदा कोयता गॅंगचा उदय झाला आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे. नगर शहरातही काय दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या वादावादी मध्ये कोयत्याचा वापर झाला होता. आता पुन्हा सुपा येथे किरकोळ कारणावरून पान शॉप चालकास कोयत्याने मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

SCROLL FOR NEXT