Kalyan Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे गटात इनकमिंग सुरु; काँग्रेसच्या २ शिलेदारांचा शिवसेना प्रवेश

Kalyan Political News : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे गटात इनकमिंग सुरु आहे. काँग्रेसच्या २ शिलेदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Vishal Gangurde

माजी नगरसेवक सदाशिव शेलार आणि दर्शना शेलार यांता शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाती घेतला शिवसेनेचा भगवा

रायगडमध्ये ठाकरे गटाचे नागेंद्र राठोड यांचा भाजपमध्ये प्रवेश

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात इनकमिंग सुरु आहे. राज्यातील विविध भागात शिंदे गटात इनकमिंग सुरु असल्याचं दिसत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही शिंदे गटाने जोरदार फिल्डिंग लावली आहे. या पालिका क्षेत्रात शिंदे गटाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांनी प्रवेश केला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे डोंबिवली शहर पूर्व विभाग ‘ए’ ब्लॉक अध्यक्ष सदाशिव शेलार आणि माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

कार्यक्रमात अजय शेलार, हिरामण मोरे, दशरथ म्हात्रे, प्रतीक शेलार, पुण्यदान सरोदे, राहुल पढाडे, मोहन भोसले, ख्वाजा शेख, सलील चौधरी, प्रसाद कीर, विशाल म्हात्रे यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शिवसेनेचा विस्तार वेगाने सुरू आहे. राज्यातील विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत.आगामी महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केलीये. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागनिहाय आढावा बैठका आणि संघटन विस्ताराचे सत्र सुरू आहे.आजचा काँग्रेसमधील हा प्रवेश पक्षासाठी बळकटी देणारा ठरला आहे.

रायगडमध्ये ठाकरे गटाला धक्का

ठाकरे गटाचे माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. नागेंद्र राठोड यांच्यासह महाड, पोलादपूर, माणगावमधील असंख्य पदाधिकारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थित मुंबई येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पत्नीला खाऊ घातले ब्लेडचे तुकडे, पतीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाच्या आलिशान कारची दुचाकीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

SCROLL FOR NEXT