Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : पोलिसांना घाबरत नाही म्हणत दहशत माजवली, खाकीची ताकद कळल्यावर चांगलीच जिरली

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील हॉटेलमध्ये तोडफोड करत लूटमार केल्याची घटना रविवारी घडली होती. तोडफोड करुन दहशत माजवणारा आरोपी वैभव इक्कर याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या सराईत गुन्हेगाराची हवेली पोलीसांनी घटनास्थळी आणून चांगलीच धुलाई केली.

आपण पोलीस काय कोणाच्या बापाला घाबरत नाही, असं म्हणत आरोपी वैभव खडकवासला किरकटवाडी शीव रस्ता परिसरात दहशत माजवत होता. त्याच रस्त्यावरून त्याची धुलाई करत पोलिसांनी धिंड काढली. या गुन्हेगाराच्या त्रासाने वैतागलेले परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलं. (Latest News)

सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावच्या हद्दीत कोल्हेवाडी येथे गुंड वैभव इक्करने हॉटेलची तोडफोड करून कामगारांना मारहाण करत पैसे लुटले होते. धक्कादायक म्हणजे याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी आलेले हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनाही आरोपीने मारहाण केली होती. (Maharashtra News)

वैभव इक्कर व त्याच्या एका साथीदाराने हॉटेलमध्ये तेथील कर्मचाऱ्यांसोबत आधी हुज्जत घालून दारुच्या बाटल्या फोडल्या. काही वेळानंतर त्या सराईत गुन्हेगाराने हॉटेलमधील कामगारांना मारहाण करत फ्रीज, काचेचे दरवाजे, दारुच्या बाटल्या यांसह इतर वस्तूंची तोडफोड करत सुमारे एक ते दीड लाखाचे नुकसान करुन गल्ल्यातील २५ ते ३० हजार रुपये काढून घेतले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT