मनसे कल्याण शहर अध्यक्ष शीतल विखणकर यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. आधी विखणकर या त्यांच्या कल्पेश अपार्टमेंट या राहत्या घरी जळाल्या होत्या, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र त्या भिवंडी कोणगाव येथील एका घरात जळाल्या होत्, अशी माहिती समोर आली आहे.
घटना घडली त्यावेळी त्यांचा ड्रायव्हर अविनाथ पाटील त्या घरात होता. पोलीस तपासादरम्यान ही घटना कोणगाव येथील घरी झाल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सध्या हे प्रकरण भिवंडी कोणगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
घरगुती गॅसच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत शीतल विखणकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. १५ डिसेंबरला दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलले जात होते. विखणकर यांना उपचारासाठी आधी भिवंडी येथील वेद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना ऐरोली येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.
या घटनेत विखणकर 80 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर विखणकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील कल्पेश अपार्टमेंट या विखणकर यांच्या राहता घरी ही घटना झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती.
मात्र आता ही घटना भिवंडी कोणगाव हद्दीतील एका इमारतीमधील घरात घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांचा ड्रायव्हर अविनाश पाटील हा त्या घरात होता. त्यानेच विखणकर यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान हे प्रकरण भिवंडी कोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण आता कोणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे खडकपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले. या धक्कादायक खुलासामुळे नेमकं या घटनेत काय घडलं? याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.