Truck-Private Bus Accident In Pune saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident News: भरधाव ट्रकची ट्रॅव्हल्सला मागून धडक! मध्यरात्री भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, १८ जखमी

Truck-Private Bus Accident: मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ ही घटना घडली.

Chandrakant Jagtap

>> अक्षय बडवे

Truck-Private Bus Accident In Pune : पुणे-बेंगलोर महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर १८ प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ ही घटना घडली.

अपघातग्रस्त बस ही खासगी कंपनी निता ट्रॅव्हल्सची असून ती रात्री प्रवाशांना घेऊन कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. तसेच ज्या ट्रकने बसला धडक दिली तो मालवाहतूक करणारा मोठा ट्रक होता. या ट्रकमध्ये साखरेचे पोती भरलेली होती.

घटनेची माहिती मिळताच या अपघात स्थळी रेस्क्यू टीम दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात (Pune Accident) जखमी अवस्थेत असलेल्या एकूण १८ प्रवाशांना पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रकने खाजगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक (Bus Accident) दिल्याने हा अपघात झाला. ही बस साताऱ्याकडून मुंबईकडे जात असताना ट्रकने मागून धडक दिली. ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident News) झाल्याची प्रथमिक माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा देखील मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

मुग, मटकी, वटाणा... कडधान्य १ महिना खाल्ली नाहीत तर शरीरावर काय परिणाम होईल?

Shiv Sena Dispute: पक्षाची रचना आम्ही ठरवू, 'मुख्य नेता हे पद आलं कुठून?' कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तीवाद,आज कोर्टात काय-काय घडलं?

SCROLL FOR NEXT