mumbai  Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : मुलीला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला अन् अनर्थ घडला; नाल्यात बुडून तरुणाचा मृत्यू, ४ मुले पोरकी

Shocking ghatkopar News : तरुणाने नाल्यात पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला. मात्र, तरुणाने जीव गमावला. घाटकोपरमध्ये ही घटना घडली आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये २८ वर्षीय तरुणासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत नाल्यात पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूने त्याची ४ मुले पोरकी झाली आहे.

घाटकोपरमध्ये नाल्यात पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी तरुण पुढे आला. तरुणाने मुलीचा जीव वाचला. पण तरुण नाल्यात बुडाला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. मुंबईतील घाटकोपर परिसरातील रमाबाई कॉलनीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. शहजाद शेख असे तरुणाचे नाव आहे. शहजाद शेख हा कडीया काम करायचा.

नेमकं काय घडलं?

अल्पवयीन मुलगी काल दुपारी एका नाल्याजवळ खेळत असताना नाल्यात पडली. त्यावेळी शहजाद शेख त्याच्या घरात होता. त्याला मुलगी बुडल्याची बातमी कळताच तो तात्काळ घराबाहेर पडला. त्याने मुलीला वाचवण्यासाठी नाल्यात उडी मारली. त्याने मुलीला वाचवले, पण स्वतःचा जीव वाचवू शकला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने शहजादचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आला. मृत शहजादला ४ लहान मुले आहेत. पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

महिलेला वाचवण्याचा प्रयत्नात पोलिसाचा मृत्यू

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात उडी मारली. या महिलेचा जीव वाचवण्यासाठी पोलीस हवालदाराने पाण्यात उडी मारली. पाण्यात उडी मारलेल्या महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस हवालदाराचा जीव गेला. अंकित तोमर (वय ३०) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव आहे. अंकितच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT