Mumbai Pune ExpressWay Traffic Jam Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway: वीकेंड इफेक्ट! मुंबई- पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Pune ExpressWay Traffic Jam: बोरघाटात (Borghat) 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Gangappa Pujari

सचिन कदम, प्रतिनिधी...

Mumbai Expressway Traffic News: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Express Way) मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. वीकेंडमुळे अनेकजण बाहेर पडल्याने ही कोंडी झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जून महिन्यातील हा पहिलाच वीकेड आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून शाळा सुरू होणार असल्याने शेवटचा विकेंड साजरा करण्यासाठी पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यामुळे मुंंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबईहून पुण्याकडे जाताना बोरघाटात (Borghat) 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने होत आहे. विकेंडमुळे (Weekend) मुंबईकर पर्यटक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत, त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

दरम्यान, या वाहतूक कोंडीमुळे (Traffic Jam) प्रवासी मात्र चांगलेच हैराण झाले आहेत. बराच वेळ एकाच ठिकाणी गाड्या थांबल्यामुळे आणि त्यात प्रचंड उकाड्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. तसेच वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT