सचिन कदम
Raigad News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवाशांना काल दिवसभर मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. केमिकल टँकर उलडल्यानंतर पेट घेतल्याने जवळपास पाच तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांची आजची सकाळही काहीशी त्रासदारक ठरली आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळ पुन्हा एक ट्रेलर उलटला. खोपोलीजवळ बोरघाटात पुण्याकडे जाणारा ट्रेलर चालकांचे नियंत्रण सुटल्याने उलटला. अपघातानंतर ट्रेलर दुभाजकावर आदळून रस्त्यावर आडवा झाला होता. (Latest Marath News)
रस्त्याच्या मधोमध ट्रेलर आडवा (Accident) झाल्याने वाहतूक खोळंबली होती. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि महामार्ग पोलिसांनी शिकस्त करून हा ट्रेलर बाजूला केला. आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.