Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police : पुण्यात ६ पोलिसांविरोधात गुन्हा, पोलिस दलात मोठी खळबळ; नेमकं कारण काय?

Pune Kothrud Police Crime : पुण्यातील कोथरुड येथे मुलींवर मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात न्यायालयाने सहा पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Alisha Khedekar

कोथरुडमधील मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरण गंभीर स्वरूपात समोर

जिल्हा सत्र न्यायालयाने सहा पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले

पोलिसांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

तपासासाठी सीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवली

सचिन जाधव, पुणे

पुण्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरातील कोथरुडममधील मुलींना मारहाण करण्यात आली होती. शिवाय जातीवाचक शब्दात शिवीगाळ देखील करण्यात आली होती. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करू घेतला नाही, परंतु हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात गेल्यानंतर संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या निर्णयाच्या विरोधात पुणे पोलीसांनी आपली बाजू ऐकुण घेण्याची विनंती केली होती. मात्र पुणे पोलीसांची बाजू एकुण घेतल्यानंतर देखील न्यायालयाने ६ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर जिल्ह्यातील २३ वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली. त्या महिलेला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला होता. या आरोपानंतर पोलिस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात नकार दिला होता. मात्र, पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हे प्रकरण गेले.

त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्याचे तात्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, पोलीस हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलीस विभागाचे धनंजय सानप पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायालयाने सहा पोलीसांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि या प्रकरणाचा तपास एक सी पी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात पुणे पोलीसांनी आपली बाजू एकुण घेण्याची विनंती केली होती. मात्र पुणे पोलीसांची बाजू एकुण घेतल्यानंतर देखील न्यायालयाने सहा पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. हे आदेश देताना पोलीसांनी अधिकारांचा गैरवापर केल्याच न्यायालयाने म्हटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंना धक्का बसणार? महत्त्वाच्या शिलेदाराची सरनाईकांसोबत चर्चा, वाचा भेटीत दडलंय काय

Chavalichi Usal Recipe: झणझणीत चवळीची उसळ सोप्या पद्धतीनं कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: तीन दिवस ठाणे शहरात ३० टक्के पाणी कपात

Loan Interest Rate: होम लोन झालं स्वस्त! या ५ बँकांनी व्याजदरात केली मोठी कपात

Maharashtra Politics: रवींद्र चव्हाण अन् निलेश राणे यांची गळाभेट, महायुतीत नेमकं चाललंय काय? VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT