Ulhasnagar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

उल्हासनगरात दुकान फोडून किराणा मालासह रोख रक्कम चोरी; त्रिकुटाला अटक

हिललाईन पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अजय दुधाणे

उल्हासनगर - किरणा दुकान फोडून ४२ हजारांची रोख रक्कम आणि साहित्य चोरी करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई हिललाईन पोलिसांनी (Police) केली आहे.कॅम्प नंबर ५ च्या गणेश नगरमध्ये कमला कुर्मी यांचे रामदेव किराणा नावाचे एक दुकान आहे. २४ मार्च च्या रात्री खिडकीची लोखंडी ग्रील तोडून ह्या तीन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.

हे देखील पाहा -

दुकानातील काऊंटरमधून ४२ हजारांची रोख रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर, मॉनिटर घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण टीम करत होती.

डीबी पथकाला गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली की आरोपी आकाश भिडे ,रामू दरयानी आणि बलबिरसिंग लभाना ह्या त्रिकुटांनी घरफोडी केल्याची, पोलिसांनी सापळा रचून ह्या तिघांनाही ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आज तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

IND vs SL ODI Fact Check: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार? व्हायरल सत्य

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

SCROLL FOR NEXT