Mumbai Local Train Vasai Incident Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: लोकल ट्रेनच्या धडकेत 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू; वसई-नायगाव परिसरातील घटना

Vasai News Today: रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरू असताना लोकल ट्रेनच्या धडकेत ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना वसई-नायगाव परिसरात घडली

Satish Daud

Mumbai Local Train Vasai Incident

रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरू असताना लोकल ट्रेनच्या धडकेत ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना वसई-नायगाव परिसरात सोमवारी (२२ जानेवारी) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वासू मित्र (वय ५६), सोमनाथ उत्तम लाबुतरे (वय ३७) आणि सचिन वानखेडे (वय ३७) अशी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास वसई-नायगाव (Vasai News) मार्गावर रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम सुरू होते.

यावेळी अचानक लोकल ट्रेन आली. रेल्वे नेमकी कोणत्या रुळावर येणार, असा गोंधळ कर्मचाऱ्यांचा झाला. त्यांनी रुळाच्या बाहेर धाव घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी भरधाव लोकलने वासू, सोमनाथ आणि सचिन यांना जोरदार धडक दिली.  (Latest Marathi News)

ही धडक इतकी भीषण होती, की तिघेही अपघातात गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती इतर कर्मचाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

गंभीर जखमी असलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तसेच अपघाती मृत्युची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT