Pune News: ..आणि ते तीन बछडे अखेर विसावले आईच्या कुशीत!
Pune News: ..आणि ते तीन बछडे अखेर विसावले आईच्या कुशीत! - Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: ..आणि ते तीन बछडे अखेर विसावले आईच्या कुशीत!

Amit Golwalkar

पिरंगुट : अहो त्या इवल्याशा पिलांकडे बघून खूप वाईट वाटायचे . .... त्यांना आईची खरंच गरज होती.... शिवाय पिलांच्या आकांताने मादी बिबट्या कोणावरही हल्ला करण्याची शक्यता असल्याने सलग दोन दिवस आम्ही टेन्शनमध्येच होतो.... आज रात्री शेवटचे तिसरे पिलू तिने तोंडात उचलून नेल्याचे कॅमेरात पाहिले आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला....... " अगदी आनंदाने आणि समाधानाने भरभरून बोलत होत्या मुळशी वनविभागाच्या वनपाल मीरा केंद्रे. (Three leopard cubs returned to mother in pune)

नेरे (ता.मुळशी) येथील उसाच्या शेतात (Farm) सापडलेल्या बिबट्याचे (Leopard) तीनही बछडे मंगळवारी रात्री दहा वाजता त्यांच्या आईच्या कुशीत विसावल्याने मुळशी वन विभागाला (Forest Department) मोठे यश मिळाले आहे. काल सोमवारी सकाळी ऊस तोडणी चालू असताना तेथील कामगारांना बिबट्याची तीन बछडी फडात दिसली होती.

त्या कामगाराने शेत मालकाला माहिती दिल्यानंतर त्यांनी ही माहिती मुळशीच्या वनविभागाला कळविली. त्यानंतर मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मीरा केंद्रे, वनरक्षक पांडूरंग कोपणर , भूगाव येथील रेस्क्यू पथकाचे नेहा पंचमिया , तोहिन सातारकर , मारुंजीचे सर्पमित्र शेखर जांभूळकर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश सोरटे, तुषार पवार ,
तसेच नेरे गावचे शेतकरी घटनास्थळी दाखल झाले .

पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पिले भरे येथील वनविभागाच्या ताब्यात काही काळ ठेवली मात्र त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला शिवाय त्यांची आई पिलांच्या ओढीने सैरावैरा भटकून कुणावरही हल्ला करू शकते या शक्यतेने ही पिले पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. त्या ठिकाणी चार कॅमेरे बसविण्यात आले. दोन ट्रॅप कॅमेरे व दोन लाईव्ह कॅमेरे बसविण्यात आले होते.

कॅमेऱ्यांमध्ये दोन दिवस मादी बिबट्याचा कोणताही मागमूस लागला नाही . मात्र आज मंगळवारी रात्री साडे आठ वाजता पहिले पिलू तर साडे नऊ वाजता दुसरे पिलू उचलल्याचे कॅमेऱ्यात दिसून आले आणि लगेचच दहा वाजता तिसरेही पिलू घेऊन जाताना आढळून आली. त्यामुळे तिनही पिले आईच्या कुशीत विसावल्याचे मोठे समाधान वनविभागाला , रेस्क्यू टिमला आणि एकूणच गावकऱ्यांनी मिळाले आहे.

वनविभागाचे हे मोठे यश म्हणावे लागेल. याबाबत भरे येथील मुळशी वनविभागाचे मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण म्हणाले , " ही बछडी सुमारे पंधरा ते तीस दिवसांच्या वयाची असावीत . त्यांना आम्ही जेव्हा ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्या खाण्या पिण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सोमवारी रात्री या बछड्यांना शोधायला त्यांची आई येईल असा अंदाज होता. मात्र तसे झाले नाही. सुमारे अडुतीस तासानंतर बछडे आईच्या कुशीत विसावल्याचे मोठे समाधान असून वरिष्ठाच्या मार्गदर्शनामुळे हे आमचे मोठे यश म्हणावे लागेल. उद्या पुढील कार्यवाही सुरू करणार आहोत. "

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey च्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

SCROLL FOR NEXT