Three and a half thousand houses in Siddharth Colony of Chembur are power cut
Three and a half thousand houses in Siddharth Colony of Chembur are power cut Chembur
मुंबई/पुणे

Chembur Power Cut: चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलोनीतील साडेतीन हजार घरांची वीज खंडीत...

जयश्री मोरे

चेंबूर: विजेची थकीत रक्कम न भरल्याने पुन्हा एकदा अदानी वीज कंपनीकडून चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलोनीमधील साडेतीन हजार घरांचा वीजपुरवठा सोमवारपासून सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद (Power Cut) करण्यात येत आहे. परिणामी स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून याबाबत तीव्र आंदोलन (Agitation) करत मागणी पूर्ण झाली नाही तर मुख्यमंत्री यांच्या निवास्थानी मोर्चा घेऊन जाणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिलाय. (Three and a half thousand houses in Siddharth Colony of Chembur are power cut...)

हे देखील पहा -

चेंबूरमधील (Chembur) पूर्व द्रुतगती मार्ग आणि शीव-पनवेल महामार्गाच्या मध्यभागी ही सिद्धार्थ कॉलोनी (Siddharth Colony) वसली असून यामध्ये साडेतीन हजार घरे आहेत. २००५ मध्ये एका विकासकाने याठिकाणी एसआरए अंतर्गत इमारती उभ्या करून झोपडीतून सर्वांना इमारतीमध्ये घरे देण्याचे आमिष दाखवले. त्याचवेळी सर्व रहिवाशांचे वीजबील देखील भरणार असल्याचे आश्वासन विकासकाने दिले होते. त्यामुळे २००५ पासून येथील साडेतीन हजार कुटुंबीयांनी वीज बील भरलेच नव्हते. कोटींच्या घरात हे वीजबील पोहचल्यानंतर २०१७ आणि २०१९ ला या सर्व रहिवाशांची वीज बंद करण्यात आली होती. मात्र काही राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

त्यानंतर यातील काही घरे सोडल्यास गेल्या तीन वर्षांपासून अनेक नागरिक नियमित वीज देयक भरत आहेत. मात्र सध्या ही थकबाकी ९९ कोटींच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे अदानी कंपनीने सोमवारपासून पुन्हा येथील वीज पुरवठा खंडीत केला आहे. तसेच विकासक आणि अदानी यांनी मिळून आमची फसवणूक केल्याचं आरोप स्थानिकांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT