उल्हासनगरात वाईन शॉप फोडुन चोरांनी गल्ला आणि महागडी दारूही चोरली... अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगरात वाईन शॉप फोडुन चोरांनी गल्ला आणि महागडी दारूही चोरली...

उल्हासनगर शहरात विकी वाईन्स या दारूच्या दुकानात चोरी झाली. कॅम्प नंबर १ च्या खेमानी भागात रात्री दुकान बंद झाल्यानंतर चोरांनी मोठ्या शिताफीने ही चोरी केली.

अजय दुधाणे

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये चोरांनी एक वाईन शॉपचे दुकान फोडले. दुकान फोडल्यानंतर चोरांनी पैसे न नेता गल्लाच उचलून नेला. एवढंच नाहीतर महागडी दारू सुद्धा चोरांनी गायब केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. (Thieves broke into a wine shop in Ulhasnagar and stole moneybox and expensive liquor ab95)

हे देखील पहा -

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरात विकी वाईन्स या दारूच्या दुकानात चोरी झाली. कॅम्प नंबर १ च्या खेमानी भागात हे विकी वाईन्स आहे. रात्री दुकान बंद झाल्यानंतर चोरांनी मोठ्या शिताफीने ही चोरी केली. रिक्षात असलेल्या चोरांनी आधी दुकानाचे शटर उचकटून आता प्रवेश केला. दुकानात शिरल्यानंतर पैसे कुठे आहे का हे तपासून पाहिलं. मात्र मोठी रक्कम काही हाती लागली नाही आणि महागड्या दारुच्या बाटल्या चोरून पोबारा केला आहे. मात्र काही वेळातच चोर पुन्हा आले आणि चोरांनी दुकानातील पैशाचा गल्ला लंपास केला.

रविवारी पहाटेच्या सुमारास हे चोरी झाली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू झाला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT