Central Railway Mega Block saam tv
मुंबई/पुणे

Mega Block News: प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, असं असेल नवीन वेळापत्रक

Central Railway Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, असं असेल नवीन वेळापत्रक

Satish Kengar

Central Railway Mega Block:

मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामासाठी ५व्या आणि ६व्या मार्गासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक असणार आहे.

कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाउन मेल एक्स्प्रेस गाड्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ०४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. (Latest Marathi News)

पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८ ) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पनवेल उपनगरी यार्ड रीमॉडेलिंगचे काम

आज रात्री १३/१४.१०.२०२३ (शुक्रवार/शनिवारी रात्री) नंतर रात्रीचे स्टेबलिंग/स्टार्टिंग वेळापत्रकानुसार केले जाईल. सर्व १२ रेक पनवेल येथे थांबवल्या जातील (स्टेबलिंग साइडिंगमध्ये १० रेक आणि प्लॅटफॉर्मवर २ रेक) हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सामान्य वेळापत्रकानुसार चालतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samir Choughule : समीर चौघुलेचा आनंद गगनात मावेना, कॉमेडी King 'या' पुरस्काराने सन्मानित, प्राजक्ता माळीने केलं खास कौतुक

Crime : महाराष्ट्राच्या लेकीची भोपाळमध्ये हत्या; प्रियकराने कुटुंबाच्या मदतीने रचला क्रूर कट; लोखंडी पेटीतून बाहेर आलं संतापजनक वास्तव

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५८,८०० होणार

Liver Problems: लिव्हरला पूर्णपणे पोखरतात हेपेटाइटिस B आणि C; पाहा व्हायरस शरीरात गेल्यावर पहिल्यांदा काय बदल दिसतात?

SCROLL FOR NEXT