Pune: जेवण बनवण्यासाठी बोलावलं घरी...अन् साधला डाव Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: जेवण बनवण्यासाठी बोलावलं घरी...अन् साधला डाव

सोबत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुण्यात Pune एका तरुणाने कंपनीत आपल्या सोबत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे झालेल्या ओळखीमधून आरोपीने पीडित तरुणीवर अत्याचार केला आहे. आरोपीने पीडित तरुणीला जेवण बनवण्याकरिता घरी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत.

याप्रकरणी २६ वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. वाकड पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल FIR करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. गणेश सुधाकर पारटकर असे गुन्हा दाखल झालेल्या 26 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो थेरगाव या गावातील रहिवासी आहे. आरोपी गणेश आणि पीडित तरुणी एकाच ठिकाणी नोकरीला आहेत.

हे देखील पहा-

नोकरी करत असताना, दोघांची चांगली मैत्री झाली होती. या ओळखीमधूनच आरोपीने पीडित तरुणीला जेवण बनवून देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले होते. याठिकाणी आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, वारंवार घरी आणि रावेत या ठिकाणी असलेल्या लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार करत असत.

यानंतर पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाविषयी विचारणा केली असता. आरोपीने आपण दुसऱ्या एका तरुणीबरोबर लग्न केल्याची माहिती पीडितेला दिली आहे. हे ऐकून पीडितेला मोठा धक्काच बसला होता. यानंतर आरोपी पीडितेशी परत जबरदस्ती करू लागला. यावेळी पीडितेने मात्र आरोपीला विरोध केला असता, त्याने पीडितेला हाताने मारहाण करत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते.

आरोपीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर, पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बलात्कारासह फसवणुकीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Poha Recipe : अवघ्या ५ मिनिटांत बनवा सकाळचा नाश्ता, आंबट-गोड 'दही पोहे' एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Nagpur : नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Smartphone Features: तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपलेली 'ही' गुप्त फीचर्स माहिती आहेत का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT