Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नाही; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

पुण्यामध्ये कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसणार

रोहिदास गाडगे

पुणे: पुण्यामध्ये कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसणार आहे, असे पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसणार आहे, तर त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे, असे राजेश देशमुख यांनी सांगितले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट (Helmet) वापरावे यासाठी त्यांना सुचना करण्यात आल्या असल्याचे देशमुख यांनी म्हणाले होते. शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रबोधन झाल्यावर सर्वसामान्य लोकांचे प्रबोधन केले जाणार असे जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) सांगितले आहे.

हे देखील पहा-

जिल्हाधिकाऱ्यांकडून काल हेल्मेटच्या वापराविषयी जे आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे पुण्यात सर्वसामान्यांना हेल्मेट सक्ती केल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून आता हेल्मेट सक्ती नसणार आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. एकीकडे राज्य मास्कमुक्त झाले आहे. पण पुणेकरांवर मात्र, सक्ती करण्यात आली होती. ही सक्ती मास्क (Mask) किंवा सोशल डिस्टन्सिंगची नाही, तर हेल्मेटची असण्याचा निर्णय करण्यात आला होता.

पुण्यामध्ये दुचाकीवरून प्रवास करताना १ एप्रिलपासून हेल्मेटसक्ती (Helmet Compulsion) प्रशासनाचे आदेश देण्यात आले होते. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका (Municipal Corporation) अशा सगळ्या परिसरात रस्त्यांवर हेल्मेट घालणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. शिवाय ४ वर्षांवर सर्वांना हेल्मेट वापरणे सक्तीचे असणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले होते. दरम्यान हेल्मेटसक्तीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील या पत्रकात दिली होती.

मात्र, पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. रस्ते अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे. त्यात हेल्मेटअभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कार चालकांच्या तुलनेमध्ये दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट अधिक असतो. रस्ते अपघातात जीव गमावलेल्यांपैकी ६२ टक्के व्यक्तींचा डोक्यावर इजा झाल्याने मृत्यू झाला आहे. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्के आहे. यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पुण्यात हेल्मेट सक्ती असणार नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT