Corona Fourth Wave Saam TV
मुंबई/पुणे

देशातील कोरोना रुग्णांची वाढ म्हणजे चौथ्या लाटेची सुरुवात? ICMR म्हणाले...

अनेकांना असा प्रश्न पडला आहे की ही चौथ्या लाटेची (Corona Fourth Wave) सुरुवात तर नाही.

वृत्तसंस्था

पुणे: सध्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण (Corona) वाढत आहेत. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की ही चौथ्या लाटेची (Corona Fourth Wave) सुरुवात तर नाही. परंतु आता यावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) माहिती दिली आहे. ICMR चे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा म्हणाले की कोरोनाच्या रुग्णांची वाढ ही केवळ स्थानीक आहे त्याचा देशावर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे ही चौथ्या लाटेची सुरुवात आहे असे म्हणू नये. देशातील काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. परंतु डॉ. पांडा म्हणाले की ही वाढ कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्यामुळे दिसत आहे.

पांडा यांनी दिल्लीचे उदाहरण दिले ते म्हणाले की दिल्लीमध्ये ज्या भागात रुग्ण वाढत आहेत त्या भागातील चाचण्याची संख्या वाढवली असता त्याचा चाचणी सकारात्मक येण्याचा ५ टक्क्यांवर गेला. ''म्हणून एखाद्या जिल्ह्यात किंवा राज्यात कोरोना चाचण्या करताना त्या भागाची लोकसंख्या लक्षात घेऊन त्यावरुन किती लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत हे लक्षात गरजेचे आहे. कारण कोरोनाचे आकडे स्थानीक पातळीवर वाढताना दिसत आहेत.'' असे डॉ. पांडा म्हणाले.

पुढे डॉ. पांडा म्हणाले की काही जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढ कमी आहे. "आम्ही जे पाहत आहोत ते ब्लीप्स आहेत. एका कोरोना प्रकारामुळे नवीन कोविड लाटाची सुरुवात नाही. हे ब्लीप्स सध्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशांपुरते मर्यादित आहेत आणि संपूर्ण देशात किंवा राज्यामध्ये एकसमान पसरलेले नाहीत," असेही ते म्हणाले. आतापर्यंत, चौथ्या वाढीचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: पुण्यात अमित शहांच्या हस्ते अजित डोवालांचा सन्मान

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT