Pune Metro Station saam tv
मुंबई/पुणे

Pune Metro Station: अबब...! पुण्यात आहे सात मजली मेट्रो स्टेशन, व्हायरल VIDEO पाहिलात का?

Viral Video On Pune Metro Station: पुण्यातील सात मजली मेट्रो स्टेशन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये या भव्य स्टेशनचे आकर्षक दृश्य दाखवले आहे. सात मजली स्टेशन पाहून अनेक लोक थक्क झाले आहेत आणि यावर विविध प्रतिक्रिया उमठत आहेत.

Dhanshri Shintre

पुणे, महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण शहर आहे. या शहरामध्ये अशी अनेक ठिकाणं आणि वस्तुस्थिती आहेत ज्यामुळे पर्यटक दूर-दूरून येथे येतात. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याचा वेगाने विकास झाला आहे, ज्यात मेट्रो प्रकल्पाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रो सेवा सुरु आहे, तर काही भागात तिचे बांधकाम चालू आहे.

भविष्यात पुणे मेट्रो सिटी म्हणून ओळखली जाईल, हे निश्चित आहे. सध्या पुण्याचे सात मजली मेट्रो स्टेशन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या मेट्रो स्टेशनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची सात मजली रचना, जी एक द्रुत आणि अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक प्रणाली दर्शवते. पुण्यातील मेट्रो नेटवर्कच्या विस्तारामुळे येथील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि शहराच्या दृषटिकोनातही मोठे बदल दिसून येतील.

सध्या सोशल मीडियावर एक व्हायरल होणारा व्हिडिओ पुण्यातील एका सात मजली मेट्रो स्टेशनचा आहे. या व्हिडिओमध्ये अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि भव्य रचनासह एक आकर्षक मेट्रो स्टेशन दिसते. या स्टेशनाची खासियत म्हणजे त्याची सुव्यवस्था, जी प्रवाशांना अत्यंत आरामदायक अनुभव प्रदान करते.

पुण्यातील सात मजली मेट्रो स्टेशन म्हणजे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन, जो एक इंटरचेंज स्टेशन आहे. येथे दोन प्रकारचे मेट्रो आहेत, एक अंडरग्राउंड आणि दुसरे एलिव्हेटेड. या स्टेशनला आशियातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन म्हणून मानले जाते. या अत्याधुनिक आणि भव्य मेट्रो स्टेशनच्या रचनामुळे पुण्याची मेट्रो सेवा आणखी प्रभावी आणि आकर्षक बनली आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि प्रवाशांना एक सुरळीत आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल.

इन्स्टाग्रामवर ek_puneri या अकाउंटवरून पुण्यातील सात मजली मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये विचारले आहे, “पुण्यात असलेल्या या सात मजली मेट्रो स्टेशनला तुम्ही कधी गेला आहात का?” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने म्हटले, "सात मजली पण जमीनीच्या आत,"तर दुसऱ्या युजरने लिहिले, “मला रिल बघितल्यावर समजले सात मजली आहे. खतरनाक स्टेशन आहे." काही युजर्सने विनोदी अंदाजात प्रतिक्रिया दिली, "गुटखा खाऊन थुंकू नका फक्त येवढच करा!" हे सात मजली मेट्रो स्टेशन पाहून अनेक लोक थक्क झाले आहेत. काही युजर्सने त्यांचे अनुभव देखील शेअर केले आहेत, जिथे त्यांनी या स्टेशनला भेट दिली होती. हे स्टेशन अत्याधुनिक आणि आकर्षक रचनेसाठी लोकप्रिय आहे आणि पुण्यातील मेट्रो सेवेला एक नवा आयाम देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT