Ambernath Potholes Saam TV
मुंबई/पुणे

Ambernath Potholes: अंबरनाथ शहरात खड्ड्यांच साम्राज्य; स्वामी समर्थ ते हुतात्मा चौक रस्त्यावर खड्डेच खड्डे

Ambernath News: अंबरनाथ शहरातील स्वामी समर्थ चौक ते हुतात्मा चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच साम्राज्य पाहायला मिळत आहे.

अजय दुधाणे

Ambernath Potholes News: अंबरनाथ शहरातील स्वामी समर्थ चौक ते हुतात्मा चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच साम्राज्य पाहायला मिळत असून याकडे नगरपालिका प्रशासनांने दुर्लक्ष केल्यामुळे अंबरनाथ मनसेने या विरोधात सोशल मोहीम सुरू केली आहे.  (Latest Marathi News)

अंबरनाथ (Ambernath) शहरातील हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौकापर्यंत बहुतांशी भागात सिमेंट काँक्रीटचा रस्ता असला तरी या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे विशेषतः दुचाकी स्वारांचे अपघात (Accident) होण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.

दुसरीकडे ज्या हुतात्मा चौकात पालिकेने मोठा खर्च करून सुशोभीकरण करण्याचा घाट घातलाय त्या चौकात सुद्धा शहराची लाज काढणारे खड्डे पडलेत. त्यामुळे आता खड्ड्यात उभा राहून इथल्या आय लव अंबरनाथच्या सेल्फी पॉइंट समोर सेल्फी काढण्याची वेळ अंबरनाथकरांवर येणार आहे.

अंबरनाथ पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून शहरातील सर्वच पक्षांनी नागरी समस्यांकडे लक्ष देणं बंद केलं असून प्रशासकही मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत.

त्यामुळे मनसेने (MNS) या विरोधात सोशल मोहीम सुरू केली असून यामध्ये "अंबरनाथच्या विकासाचा पॅटर्न श्री स्वामी समर्थ चौक ते हुतात्मा चौक या रस्त्यातील डांबरी भागात चंद्राचं दर्शन "अशी पोस्ट व्हायरलं करत आहेत. त्यामुळे एखादा अपघात झाल्यावर नगर पालिकेला जाग येणार का असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

SCROLL FOR NEXT