Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

SRA पुर्नविकास प्रकल्पात फसवणुक? बिल्डरची ईडीकडून चाैकशी करा, थेट मुख्यमंत्र्यांकडे रहिवाशांची दाद

ओशिवरा येथील SRA निवासी इमारतीत विकासकाने पुर्नविकास करताना बांधकामात अनियमीतत्ता व कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News - गोरेगावच्या रखडलेल्या पत्राचाळ प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी ईडीने केली. याच प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांना २ महिने तुरुंगवास भोगावा लागला. दरम्यान पश्चिम उपनगरात SRA पुर्नविकास प्रकल्पात फसवणूक आणि नियम पायदळी तुडवल्याच्या आरोपाखाली विकासकाची ईडी (ED) व आर्थिक गुन्हेशाखेकडून चौकशी करण्यात यावी. यासाठी रहिवाशांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून तक्रार केली आहे

ओशिवरा येथील SRA निवासी इमारतीत विकासकाने पुर्नविकास करताना बांधकामात अनियमीतत्ता व कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. याबाबत रहिवाशांनी 'सहयोग होम्स' नावाच्या विकासका विरोधात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करत, विकासकाविरोधाच ईडी व आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीची मागणी केली आहे. विकासकाने पुर्नविकास प्रकल्पात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत, इमारत उभी करताना नियम पायदळी तुडवल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी पत्रात केला आहे.

तर इमारतीत विकासकाने अग्निशमन दलाचे नियमही पायदळी तुडवल्याचा आरोप रहिवाशी करत आहेत. रहिवाशांच्या तक्रारीनंतर अग्निशमन दलानेही विकासकाला नोटीस काढून ३० दिवसात उत्तर देण्याचे बजावले आहे. मात्र अग्निशमन दलाच्या नोटीसलाही विकसकाने केराची टोपली दाखवली. विकासकाच्या मनमानी कारभारमुळे नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन रहात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT