Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुरणपोळीत पुरण कमी घातलं! ग्राहकाचा पारा चढला, स्नॅक्स सेंटर चालकालाच हाणला

Pune Crime News: पुण्यातील वाघोलीत पुरणपोळीतील पुरण कमी असल्याच्या वादावरून मारहाण आणि शिवीगाळ झाली. मंगळवारी आस्वाद ५१ या स्नॅक्स सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे/ साम टिव्ही न्यूज

पुण्यातील वाघोली परिसरात पुरणपोळीतील पुरण कमी असल्यावरून वाद निर्माण होऊन मारहाणीची आणि शिवीगाळी करण्याची घटना घडली आहे. वाघोली येथील आस्वाद ५१ या स्नॅक्स सेंटरमध्ये मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे "आस्वाद ५१" नावाचे स्नॅक्स सेंटर आहे. सकाळी दोन ग्राहकांनी स्नॅक्स सेंटरमध्ये येऊन पुरणपोळी ऑर्डर केली. मात्र, खाताना त्या पुरणपोळीत पुरण कमी असल्याचा आरोप करून ग्राहकांनी वाद घातला. या वादाच्या वेळी ग्राहकांपैकी एकाने स्नॅक्स सेंटर चालकाला आधी शिवीगाळ केली आणि नंतर खुर्चीने मारहाण केली.

वाद मिटवण्यासाठी फिर्यादी यांची बहीण मधे आली असता, आरोपींनी तिलाही शिवीगाळ केली आणि मारहाण करत धमक्या दिल्या. या सगळ्या प्रकारानंतर आरोपी आपल्या साथीदारासोबत बिल न देता स्नॅक्स सेंटरमधून निघून गेले. या घटनेनंतर स्नॅक्स सेंटर चालकाने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आहे. मारहाणीच्या आरोपाखाली आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सामान्यतः ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता असते, परंतु या घटनेत वादाला हिंसक वळण लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुरणपोळीतील पुरणाच्या प्रमाणावरून सुरू झालेला वाद थेट शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत पोहोचल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकारामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांकडून तातडीने कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

SCROLL FOR NEXT