फेरीवाल्यांबरोबर केक कापणे लिपीकाला पडले महागात; पालिकेने केली थेट निलंबनाची कारवाई विकास काटे
मुंबई/पुणे

फेरीवाल्यांबरोबर केक कापणे लिपीकाला पडले महागात; पालिकेने केली थेट निलंबनाची कारवाई

फेरीवाल्यांबरोबर केप कापून आपला वाढदिवस साजरा केला म्हणून पालिकेकडून विवेक महाडीक या लिपिकावरती निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : फेरीवाल्यावरंती कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरती एका फेरीवाल्याकडून जीवघेणा हल्ला केला होता. आणि या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फेरीवाल्यांबरोबर केप कापून आपला वाढदिवस साजरा करणंठाणे महापलिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील विवेक महाडीक या लिपिकाला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्यावर महापलिका प्रशासनाने शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई केली आहे.The municipality has taken disciplinary action against the clerk with suspension.

हे देखील पहा-

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सांयकाळी जीवघेणा हल्ला झाला. त्यात त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली. तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षकाचेही एक बोट कापले गेले. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या विरोधात थेट कारवाई करण्यात आली आहे आणि ती आजही चालूच होती.

दोन्ही ठाकरेंकडून आश्वासन आणि विश्वास...

दरम्यान कल्पिता पिंपळेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोनही आला आणि दोषींवरती कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे, तर तुम्हा लवकर बऱ्या व्हा आणि फेरीवाल्यांच काय करायच ते आमच्यावरती सोडा असा विश्वास राज ठाकरेंनी दिला आहे. तसेच तो फेरीवाला पोलिसांकडून सुटल्यावर मनसैनिकांकडून मार खाणार असंही वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

IPL Success Story: बापाची जिद्द, पोराची मेहनत, कर्ज काढून क्रिकेट खेळायला पाठवलं, शहापूरचा लेक IPLमध्ये खेळणार

Pune : मोठी बातमी! भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले, आयोगाची मोठी कारवाई

रात्रीच्या अंधारातही मांजरीला शिकार कशी दिसते?

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT