Mumbai Local
Mumbai Local saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local : लोकलच्या मोटरमनला अचानक आली भोवळ अन्... मालाड स्थानकातील धक्कादायक प्रकार

Satish Daud-Patil

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Local Train : मुंबई लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. मुंबईकरांना प्रवास करण्यासाठी मुंबई लोकल हेच सर्वोत्तम साधन असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लोकलचे मोटारमन ३६५ दिवस न थकता काम करत असतात. मात्र याच मोटरमनच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

मंगळवारी (३१ जानेवारी) दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या धिम्या लोकलच्या मोटरमनला अचानक चक्कर आली आणि तो थेट केबिनमध्ये पडला.

सुदैवाने लोकल मालाड स्थानकावर थांबली असल्याने मोठा अनर्थ टळला. जर धावत्या ट्रेनमध्ये ही घटना घडली असती, तर मात्र मोठा अपघात घडला असता. मनीष कुमार असं चक्कर येऊन पडलेल्या मोटरमनचं नाव आहे. (Mumbai Local Train)

या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने मनीष यांच्याकडे धाव घेतली. ताबडतोब डॉक्टरांना बोलावून मनीष कुमार यांची तपासणी देखील करण्यात आली. आता मनीष कुमार यांची तब्येत स्थिर आहे. मात्र, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे मोटरमन दबावखाली असल्याची कुजबुज रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

SCROLL FOR NEXT