Kirit Somaiya Saam TV
मुंबई/पुणे

'विक्रांत'साठी गोळा केलेले पैसे पक्षाला दिले; सोमय्यांच्या वकिलांची कोर्टात माहिती

भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू असताना सोमय्यांच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती दिली आहे.

सुरज सावंत

मुंबई : आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी आम्ही राजभवनात द्यायला गेलो होतो. मात्र तिथं कोणतही खातं नसल्यामुळे आम्ही ते पैसे पक्षाला दिले, असा दावा किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) वकिलांनी आज कोर्टासमोर केला.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू असताना, सोमय्यांच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती दिली आहे. तसंच हे प्रकरण खूप जुनं आहे. विक्रांतसाठी फक्त आम्हीच नव्हे, तर शिवसेनेने देखील (Shivsena) पैसे गोळा केले होते, अशी माहिती सोमय्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील ऋषिकेश मुंदरागी यांनी कोर्टाला दिली.

हे देखील पाहा

तसंच त्यांनी ही घटना 2013 सालची आहे. जेव्हा विक्रांत युद्धनौका वाचवण्याची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत राज्य सरकार आणि मुंबई महापालिका सहभागी होती. तक्रारदारांनी दिलेली तक्रार ही प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विक्रांतसाठी शिवसेनेही पैसे जमा केले होते आम्ही पैसे द्यायला गेलो होतो, मात्र खातं नसल्यामुळे आम्ही ते पैसे पार्टीला दिले असल्याचा युक्तीवादही वकीलांनी कोर्टासमोर केला.

दरम्यान, आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजाला वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी विशेष न्यायालयानेसोमय्या पिता-पुत्रांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी पूर्ण केली असून आदेश राखून ठेवला असून कोर्ट सोमय्या पिता-पुत्रांसंदर्भात आजच आपला आदेश देणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT