सेलूचे नगराध्यक्ष राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेच नाहीत - नवाब मलिक Saam Tv
मुंबई/पुणे

सेलूचे नगराध्यक्ष राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेच नाहीत - नवाब मलिक

'घरावर आंदोलन करण्याची भूमिका योग्य नाही. कुठल्याही पक्षाने कुणाच्या घराबाहेर अथवा एखाद्या पक्षाच्या कार्यालयाबाहेब आंदोलन करणे योग्य नाही यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होते हा नवा पायंडा योग्य नाही.'

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

परभणी : सेलूचे नगराध्यक्ष राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये (Congress) गेले हा दावा खोटा आहे. तसंच सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बोराडे हे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष नसल्याचा दावा आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. आज ते आज मुंबईत काँग्रेसतर्फे देवेंद्र फडणवणीसांच्या (Devendra Fadnavis) घरावरती करण्यात आलेल्या आंदोलनावरुन तिथे झालेल्या वादविवादावरुन पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी मलिक म्हणाले, 'घरावर आंदोलन करण्याची भूमिका योग्य नाही. कुठल्याही पक्षाने कुणाच्या घराबाहेर अथवा एखाद्या पक्षाच्या कार्यालयाबाहेब आंदोलन करणे योग्य नाही यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होते हा नवा पायंडा योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने हे करू नये यामुळे प्रशासनावर, पोलिसांवर ताण येतो सर्व पक्षांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे तसंच आंदोलन करायला जागा ठरवून दिली आहे तिथे आंदोलन केले पाहिजेत.' असं परखड मत राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज मांडले आहे.

दरम्यान परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि सेलू या नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता याबाबत बोलताना ते म्हणाले, सेलूचे नगराध्यक्ष राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेले हा दावा खोटा आहे. सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बोराडे हे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष नाहीत. ते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. स्थानिक आघाडी करून ते निवडून आले. राष्ट्रवादीचे नगरसेवक पक्ष सोडून गेले हे बोलणे बरोबर नाही. परभणीतील २ नगरसेवक गेले हे खरं असल्याचही त्यांनी कबूल केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT