पुण्यात बर्फ कंपनीवर विज पडतानाचे दृश्य फोनमध्ये कैद; पाहा Video Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यात बर्फ कंपनीवर विज पडतानाचे दृश्य फोनमध्ये कैद; पाहा Video

अशीच एक वीज पडताना (The lightning struck) ची घटना पुण्यातील दौंड (Pune Daund) तालुक्यातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे: पावसात (Heavy Rain) काही ठिकाणी आकाशातून विज पडण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशीच एक वीज पडताना (The lightning struck) ची घटना पुण्यातील दौंड (Pune Daund) तालुक्यातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केली आहे. काल दुपारपासूनच दौंड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आले होते आणि अचानक विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. दौंड शहरातील विविध भागांमध्ये विजांचा कडकडाट ऐकायला मिळत होता. त्यामुळे हॉटेल आणि ऑफिसेसमध्ये आसरा घेणारे लोक आता हि वीज कुठे न कुठे पडणार’ अशी चर्चा करताना दिसत होते. पावसाचा जोर वाढत असतानाच शहरातील लिंगाळी रोडवर असणाऱ्या बर्फ फॅक्टरी बिल्डिंगवर बॉम्ब हल्ला व्हावा तशी कडकडाटात वीज येऊन आदळली. यावेळी पाऊस आणि विजांचे व्हिडीओ बनविणाऱ्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हे सर्व चित्रित झाले आणि पाहता पाहता हा व्हिडीओ अनेक ठिकाणी व्हायरल झाला.

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. अजून पंचनामे झाले नसून शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाहीये. काल राज्य मंत्रीमंडळ बैठकीत विजय वड्डेटीवार यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. परंतु ती मदत जेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा शेतकऱ्याला खरा आधार मिळेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT