Navneet Rana/Ravi Rana Video Saam TV
मुंबई/पुणे

राणा दाम्पत्याचा चहा पितानाचा तो व्हिडिओ नेमका कुठला? वकिलांनी केला मोठा दावा

पोलीस ठाण्याच्या कोठडीत हीन वागणूक मिळत असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पोलीस ठाण्याच्या कोठडीत हीन वागणूक मिळत असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Navneet Rana and Ravi Rana) यांनी केला होता. यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी राणा दाम्पत्याचा पोलीस ठाण्यातला चहा पितानाचा व्हिडिओ ट्विट केला होता. यानंतर नवनीत राणांचे वकील रिझवान मर्चंट यांनी मोठा दावा केला आहे. राणा दाम्पत्यानं सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या कोठडी संदर्भात तक्रार केली आहे. त्यांनी खार पोलीस ठाण्याच्या (Khar police Station) कोठडी संदर्भात तक्रार केलेली नाही. खासदार नवनीत राणा यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या कोठडीत अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार केली होती. मात्र, मुंबई पोलीस आयुक्तांनी खार पोलीस ठाण्यातील व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, असं मर्चंट यांचं म्हणणं आहे.

खासदार नवनीत राणा यांनी कोठडीत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पोलिसांवर केला होता. याबाबत त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. दुसरीकडे, याच मुद्द्यावरून भाजप आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांवर आरोप केले होते. यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज ट्विट केले होते.

या व्हिडिओमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा चहा पिताना दिसत आहेत. मात्र, मुंबई पोलीस आयुक्तांचा हा दावा राणांचे वकील मर्चंट यांनी फेटाळला. खासदार नवनीत राणा यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील (Santa Cruz Police Station) कोठडीत मिळालेल्या वागणुकीसंदर्भात तक्रार केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी ट्विट केलेला व्हिडिओ हा खार पोलीस ठाण्याचा आहे, असे मर्चंट यांनी सांगितलं.

पोलीस कोठडीत पिण्याचे पाणी दिले जात नाही, तसेच वॉशरूमलाही जाण्याची परवानगी दिली नाही, असा आरोप खासदार नवनीत राणांनी केला होता. यावरून महाविकास आघाडी सरकार, मुंबई पोलिसांवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपनं (BJP) टीकेची झोड उठवली होती. तसंच कोठडीत हीन वागणूक मिळाल्याची तक्रार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडेही केली होती.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Urfi Javed: डोळ्याखाली जखम, चेहऱ्यावर रक्त; उर्फी जावेदची अशी का झाली अवस्था ? चाहते चिंतेत

७५ वर्षीय वृद्धेचे अब्रुचे लचके तोडले, झोपडपट्टीत घुसून तरूणाकडून जबरदस्ती, परिसरात खळबळ

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

SCROLL FOR NEXT