धक्कादायक ! सोडून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळ Saam tv news
मुंबई/पुणे

धक्कादायक ! सोडून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळ

नशेबाज नवऱ्याला कंटाळून पत्नी तिच्या उत्तर प्रदेशातील घरी गेली म्हणून तिला परत आणण्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळणा-या पतीला कुरार पोलिसांनी अटक केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज सावंत,

मुंबई : पत्नी सोडून गेल्यानंतर नवरे पत्नीला समजावून पून्हा घरी आणण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवतात. मात्र कुरारमध्ये एका माथेफिरूने थेट मुलाच्या निधनाचा बनाव करून पत्नीला परत आणण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नशेबाज नवऱ्याला कंटाळून पत्नी तिच्या उत्तर प्रदेशातील घरी गेली म्हणून तिला परत आणण्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळणा-या पतीला कुरार पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती मद्यपी व अंमली पदार्थांचा नियमीत सेवन करत असल्याची माहिती समोर आली आहे.

कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश वेले यांनी याबाबत माहिती दिली आहे. अजय गौड(30) असे अटक आरोपीचे नाव असून तो मालाड(पू.) येथील कुरार परिसरातील रहिवासी आहे. गौड व्यवसायाने रंगकाम करणारा असून दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असल्यामुळे त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती. 13 वर्षाची मुलगी, आठ वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी व नऊ महिन्याची मुलगी अशी आरोपीचा चार मुले आहेत. आरोपीची पत्नी चारही मुलांना घेऊन उत्तर प्रदेशात गेली होती. पण शाळा सुरू होऊन या आशेने तिने दोन मोठ्या मुलांना मुंबईला पाठवले. तो मुलांनाही मारहाण करत होता. तसेच पत्नी परत येण्यास तयार नसल्यामुळे तो संतापला होता. पत्नीला परत आणण्यासाठी त्याने स्टंट करण्याचे ठरवले व मुलांचे जीव धोक्यात घातले.

हे देखील पहा-

शनिवारी रात्री त्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी मुलाला जमीनीवर झोपण्यास सांगितले व त्याच्या अंगावर पांढरा कपडा घातला. त्यानंतर त्याचे छायाचित्र घेतले. तेवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने गळफास बनवला व पंख्याला बांधून तो मुलीच्या गळ्यात घातला. त्यानंतर तिला बादलीवर उभी राहण्यास सांगितले. त्याने मुलीला बादलीवरून उडी मारण्यास सांगितले. अन्यथा तो बादली पाडेल, अशी धमकी दिली. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करण्यास सुरूवात केला.

मुलाचा आवाज ऐकून शेजारच्यांनी गौडच्या घरी धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. शेजारी राहणा-या व्यक्तींनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात भादंवि कलम 307 अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: क्षुल्लक वादातून आधी बायकोची हत्या, नंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवलं; पुण्यात खळबळ

Zubeen Garg: झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, लोकप्रिय संगीतकार आणि गायिकेला अटक

Maharashtra Live News Update: राज्यात 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही, धक्कादायक आकडेवारी समोर

Gold Rate Today: खुशखबर! दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Raigad Crime: घरात एकटी असल्याचे पाहून घुसला, १० वर्षीय मुलीवर बलात्कार; रायगड हादरले

SCROLL FOR NEXT