Amit Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक; वडिलांनी शेअर केला फोटो

अमित ठाकरे यांनी आपल्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांपूर्वी आजोबा झाले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याने ठाकरे परिवारात उत्सवाचं वातावरण आहे. अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. त्यानंतर आता अमित ठाकरे यांनी आपल्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हे देखील पहा -

या फोटोमध्ये अमित ठाकरे यांनी चिमुकल्याच्या बाळाच्या हाताची करंगळी पकडली असल्याचे दिसून येत आहे. सध्या हा फोटो व्हायरलही झाला आहे. अमित ठाकरे यांच्या बाळाचे नामकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्या बाळाचे नाव नाव काय असणार याची देखील उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

राज ठाकरे यांच्या घरी 5 एप्रिल रोजी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले. त्यांनतर नठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचं वातवरण पाहायला मिळतं आहे.अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता. राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी स्थलांतरीत झाले आहेत. या नव्या घरी आता राजकारणासह चिमुकली पावलंही नांदणार आहे. शर्मीला ठाकरे आजी झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT