कौटुंबिक वाद मिटवायला 'तो' न्यायालयात गेला, म्हणून जातपंचायतीने त्याच्या कुटुंबावरच बहिष्कार टाकला! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

कौटुंबिक वाद मिटवायला 'तो' न्यायालयात गेला, म्हणून जातपंचायतीने त्याच्या कुटुंबावरच बहिष्कार टाकला!

न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला म्हणून, गोंधळी सामाजाच्या जात पंचायतीने एका गोंधळी कुटुंबाला चक्क वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पुरोगामी Progressive समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जात पंचायतीचा जाच दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. न्यायालयातIn Court घटस्फोटासाठी Divorce अर्ज केला म्हणून, गोंधळी सामाजाच्या जात पंचायतीने एका गोंधळी कुटुंबाला चक्क वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.The caste panchayat boycotted the family

हे देखील पहा-

पिंपरी-चिंचवडच्याPimpri-Chinchwad वाकड पोलिस ठाण्याच्या Wakad Police Station अंतर्गत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात वाकड पोलिस ठाण्यामध्ये पीडित सीताराम सागरे या तरुणाने गोंधळी समाजाच्या जात पंचायतीतील 14 पंचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादीचा आणि त्याच्या पत्नीचा वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याने, घटस्फोट घेण्यासाठी फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती मात्र फिर्यादीच घटस्फोटासाठी न्यायालयात जाण्याला जात पंचायतींने विरोध केला आहे.

न्यायालयात जाण्या ऐवजी हा घटस्फोटाचा कौटुंबिक वाद जातपंचायतीत मिटवायला हवा होता. अशी कठोर भूमिका जात पंचायतिने घेतली अशातच फिर्यादीची पत्नी ही जातपंचायतीच्या सदस्यांची नातेवाईक  असल्याने,  फिर्यादीने जातपंचायती ऐवजी न्यायालयात घटस्फोट घेण्यासाठी प्रयत्न केल्याच्या कारणावरुण संतप्त झालेल्या जात पंचायतीने गोंधळी समाजाच्या अख्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे.

सिताराम सागरे यांना जवळपास दोन वर्षापासून जातपंचायतीचा जाच सहन करावा लागत असल्याच सांगितल आहे अखेर सिताराम सागरे यांनी केलेल्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर वाकड पोलिसांनी गोंधळी समाजाच्या 14 पंचांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी  दिवसेंदिवस जातीचे राजकारण  केलं जात आहे. त्यासाठी वेगळे मोर्चे काढून आंदोलन केलं जातात, अस एकंदरीत राज्यात चित्र आहे. अशातच  जात आणि जात पंचायत महाराष्ट्रातून खरंच निर्मूलन होईल का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holidays: बँक ग्राहकांनो, लक्ष द्या! महाराष्ट्रात सलग 4 दिवस बँका; जाणून घ्या पूर्ण माहिती

Freezer Defrost Tips: फ्रीजरमध्ये साचलाय बर्फाचा डोंगर? या ३ सोप्या आणि सेफ पद्धतींनी मिनिटांत करा डीफ्रॉस्ट

Relationship Tips : मुलींना कसा जोडीदार हवा असतो? मुलांनो आजच अंगिकारा 'या' ६ सवयी

Satara Fort : दोन शिखरे, घनदाट जंगल; 'या' किल्ल्यावर पाहता येईल इतिहास अन् निसर्गाचा अद्भुत संगम

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; माणगाव-इंदापूरदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT