water cut in Thane SAAM TV
मुंबई/पुणे

ठाणेकरांवर पाणीसंकट, 24 तास 10 टक्के पाणीकपात यातला तुमचा एरिया कोणता? वाचा

यंदाच्या पावसाळ्यातील अपुरा पाऊस, अलनिनोचा प्रभाव आणि मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.

Saam Tv

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यंदाच्या पावसाळ्यानंतर झालेला कमी पाऊस, अलनिनोचा प्रभाव आणि ऑक्टोबर २०२६ मध्ये मान्सूनने घेतलेली माघार यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, शासन निर्णयानुसार ठाण्यात १० टक्के पाणी कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे (काही भागांत) प्रभाग समित्यांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (MIDC) पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामार्फत होणारा पाणीपुरवठा गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपासून ते शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत, म्हणजेच सलग २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणी कपातीच्या या २४ तासांच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत कोणत्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील?

  • दिवा प्रभाग समितीचे सर्व भाग.

  • मुंब्रा प्रभाग समिती (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळून).

  • कळवा प्रभाग समितीचे संपूर्ण क्षेत्र.

  • वागळे प्रभाग समितीअंतर्गत येणारे रुपादेवी पाडा, किसननगर नं. २ आणि नेहरुनगर.

  • मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत येणारा कोलशेत खालचा गाव परिसर.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

ठाणे महानगरपालिका नियोजित २४ तासांचा शटडाऊन संपल्यानंतर जेव्हा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, तेव्हा पुढील 1-2 दिवस संबंधित परिसरांमध्ये पाणी कमी दाबाने उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांनी ऐन वेळी पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच या २४ तासांच्या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणी कपातीविरोधात मनसेचे मटका फोड आंदोलन

Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Makhana Vs Peanuts: मखाने की शेंगदाणे? नवरात्रीच्या उपवासाला काय खाणे अधिक फायदेशीर?

Blue Drum Verdict Case : निळ्या ड्रममधील हत्याकांडप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कान आणि साहिलला सुनावली फाशीची शिक्षा!

Iphone Offer: 1 लाखाचा आयफोन फक्त 50 हजारांत, कुठे आहे ही भन्नाट ऑफर?

SCROLL FOR NEXT