Thane Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Thane : पार्किंगचा वाद, शिंदेसेनेच्या शाखाप्रमुखानं तलवार घेऊन राडा घातला; ठाण्यातला Video Viral

Thane News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेच्या एका शाखाप्रमुखाने वागळे इस्टेट परिसरात तलवार दाखवत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. साथीदारासह त्याने एका माणसावर हल्ला देखील केला.

Yash Shirke

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Thane Crime : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखाने किरकोळ कारणावरुन तलवार उपसून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. पार्किंगच्या वादातून शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याने तलवार उपसल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात आकाश भालेराव आणि सूरज हजारे हे दोन युवक तलवार घेऊन दमदाटी करत होते. हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. तलवार दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही युवकांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तलवार दाखवत गुंडगिरी करणारा आकाश भालेराव हा शिंदेसेनेचा शाखा प्रमुख आहे. दोघेही वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साठे नगर येथील रहिवासी आहेत. आकाश आणि सूरज यांचा तलवार दाखवत एका माणसावर हल्ला करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी या दोघांवर कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट पी.ओ.एस.गु.आर.क्रमांक ५३३/२०२५ आयपीसी कलम १०९, ३(५), आयपीसी कलम ४, २५, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१), १३५, रोजगार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत आरोपी आकाश आनंद भालेराव (वय २५ वर्षे) आणि आरोपी सूरज दत्ता हजारे (वय २६ वर्षे) यांना २३ जुलै २०२५ रोजी वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २५ येथून गुन्हे शाखा युनिट ५ ने ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT