Thane Police Officer Kisan Bhoir Dies saam tv
मुंबई/पुणे

PSI ची हत्या, ठाण्यातील कुख्यात गुंडाला अटक; महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ

PSI Kisan Bhoir Killed in Thane: ठाण्यात रात्री गस्त घालत असलेल्या PSI किसन भोईर यांचा मृत्यू झाला. राजू वाल्मिकी याला पोलिसांनी अटक केली असून चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री गस्त घालत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची (PSI) एका गावगुंडाने हत्या केल्याची घटना घडली आहे. PSI किसन भोईर असे मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी राजू वाल्मिकी याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, PSI किसन भोईर हे रात्री गस्तीवर होते. यावेळी काही दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे भोईर कारवाई करण्यासाठी संबंधित ठिकाणी गेले होते.

त्यावेळी रस्त्यावर राजू वाल्मिकी हा दारू पित बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. PSI भोईर यांनी त्याला हटकले आणि पोलिसांच्या वाहनात बसण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. यावेळी राजू वाल्मिकी याने PSI किसन भोईर यांना जोरदार धक्का दिल्याची माहिती आहे. हा धक्का बसल्यानंतर भोईर जमिनीवर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

डोक्याला जबर मार लागल्याने PSI किसन भोईर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी राजू वाल्मिकी याला तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित चितळसर पोलीस ठाणे येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून यवतमाळमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Maharashtra Politics: सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी खरंच शिंदेसेनेत प्रवेश केला का? स्वत: सांगितले सत्य

भाजपला सर्वात मोठा धक्का! दोन बड्या नेत्यांसह नेते-पदाधिकाऱ्यांचा 'सपा'त प्रवेश

नवरात्रीत भोंडल्यासाठी 5 खास उखाणे; जे ऐकून सर्वांनाच आनंद होईल

Pimpri-Chinchwad : २-३ दिवसांत करा पिंपरी-चिंचवडची सफर, ऑक्टोबरमध्ये ट्रिपसाठी 'ही' ७ ठिकाणे बेस्ट!

SCROLL FOR NEXT