kalyan crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: पत्नीच्या धमक्यांमुळे पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; कुटुंबीयांचा आरोप, कल्याणमधील धक्कादायक घटना

Kalyan Crime News: पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News: ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

ठाणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचे गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबत वाद सुरू होते. त्यानंतर पत्नीकडून वारंवार धमकी आणि दबाव टाकला जात असल्याने कर्मचाऱ्याने जीवन संपवण्याचे प्रयत्न केला, असा आरोप हा पोलीस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी केला आहे .

याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावी, अशी मागणी पोलीस बॉइज संघटनेचे उमेश भारती यांनी केली आहे. (Kalyan Crime News)

कल्याण पश्चिमेकडे या पोलीस कर्मचाऱ्याचं कुटुंब राहतं. आज सकाळच्या सुमारास या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्याचे नातेवाईक व त्याच्या मित्राने त्याला रुग्णालयात दाखल केले. या पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मुंबईत पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; घटनेनंतर आरोपी फरार

मुंबईच्या खारमध्ये पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खार पश्चिम परिसरात ही घटना घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणाचा तपास खार पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT