Kalicharan Maharaj Saam Tv
मुंबई/पुणे

Kalicharan Maharaj: कालीचरण महाराज अटकेत; उद्या नेणार न्यायालयात

राज्यातील विविध जिल्ह्यात कालीचरण महाराजांवर गुन्हे दाखल आहेत.

विकास काटे, ठाणे

ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेल्या कालिचरण महाराज यांच्यावर राज्यातील विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. नौपाडा पोलिसांनी याच गुन्ह्यात हवे असलेल्या कालिचरण महाराजांना (kalicharan maharaj) आज (गुरुवार) ताब्यात घेतले आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Kalicharan Maharaj Bail hearing Tomorrow)

कालिचरण महाराज यांनी महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले हाेते. त्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली हाेती. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात कालिचरण महाराज यांचा निषेध नाेंदविला गेला. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले गेले.

कालीचरण महाराजांना वर्धा आणि पुणे (pune) पोलिसांनी अटक देखील केली हाेती. आता गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्या तक्रारीनूसार नौपाडा पोलिसांनी कालीचरण महाराजांना रायपूर प्रशासनाकडून ताब्यात घेतलं आहे. उद्या (शुक्रवार) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१५५ ग्रॅम MD, दोन आयफोन आणि दोन आरोपी; मुंबई पोलिसांनी उधळला डाव

Maharashtra News Live Update: इम्रान खान यांनी बिनशर्त माफी मागावी; मुंबई उच्च न्यायालयाचे कडक निर्देश

Blood Sugar : गोड पदार्थ खाणं बंद करूनही रक्तातील साखर वाढतेय? रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायत जीवघेण्या

Custard Apple For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी सिताफळ खावे की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी कोणते फळ खावे

Dombivli water crisis : डोंबिवलीत पाणीबाणी! १६ तास पाणीपुरवठा बंद राहणार, कोणत्या भागाला बसणार फटका?

SCROLL FOR NEXT