crime news Saam tv
मुंबई/पुणे

Thane Crime: आधी लैंगिक अत्याचार मग लग्न, सिगारेट अन् गरम तव्याचेही चटके; पैशांचीही केली मागणी

Thane blackmail and torture case: एका व्यक्तीने आधी महिलेसोबत चार वर्षांपूर्वी मैत्री केली. नंतर लैंगिक अत्याचार केला, ब्लॅकमेल करून लग्नही केलं. पण लग्नानंतरही त्याने जाच करायचं सोडलं नाही.

Bhagyashree Kamble

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आधी सोशल मीडियावर ३८ वर्षीय व्यक्तीची २७ वर्षीय तरूणीशी भेट झाली. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. पण हळूहळू माणसाच्या आतला सैतान जागा झाला. त्याने तरूणीवर लैगिंक अत्याचार केला. नंतर ब्लॅकमेल करून तिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर देखील त्याने जाच करायचे सोडले नाही. सिगारेट आणि गरम तव्याचे चटके देऊन तरूणीचा छळ करायचा. तरूणीने यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली असून, आरोपीविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर अनेक जणांच्या भेटीगाठी होतात. नव्या लोकांशी आपला संपर्क वाढतो. मैत्री देखील होते. पण स्क्रीनमागे दडलेला व्यक्तीचा खरा चेहरा आपल्याला ठाऊकच नसतो. ज्याचा आपल्यालाच त्रास होतो. ठाणे जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आधी महिलेसोबत चार वर्षांपूर्वी मैत्री केली. नंतर लैंगिक अत्याचार केला, ब्लॅकमेल करून लग्नही केलं. पण लग्नानंतरही त्याने जाच करायचं सोडलं नाही.

लग्नानंतरही तो महिलेला सिगारेट आणि गरम तव्याचे चटके द्यायचा. याच जाचाला कंटाळून महिलेने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पती आणि त्याच्या कुटुंबातील ५ सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत एफआयआर नोंदवला आहे.

पीडितेच्या तक्रारीचा हवाला देत पोलिसांनी सांगितले, २०१९ साली दोघांची सोशल मीडियात मैत्री झाली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने पीडितेचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. नंतर याच व्हिडिओच्या आधारे तो तरूणीला ब्लॅकमेल करायचा. नंतर लग्न करण्यास भाग पाडून सिगारेट आणि गरम तव्याचेही चटके द्यायचा.

आरोपीने फक्त शारीरिक नाही तर, मानसिक छळ करण्यासही सुरूवात केली. आरोपीने तिचे आधार, पॅन कार्ड आणि बँक पासबुक घेऊन कर्ज घेण्यासाठी तिच्या कागदपत्रांचा वापर केला. त्यानंतर पैशांची देखील मागणी करू लागला. पैसे दिले नाही तर, आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणार अशी धमकीही त्याने दिली. मात्र, महिलेने याच जाचाला कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT